रविवार, १६ नोव्हेंबर, २००८

मराठी मानसाला काय वाटते....

लोकं बोलतात की मराठी माणूस आम्ही उत्तर भारतीय आहोत म्हणुन येथून ( महाराष्ट्रातुन )
जाण्यास म्हणतात परन्तु मुद्दा तो नसून तुम्ही मागील १० -१२ वर्ष पासून तुम्ही इथे राहत आहात।
तरीही तुम्ही इथली संस्कृति , भाषा याला शिकू शकले नाही अथवा शिकण्याचा प्रयत्न केला नाही,
याला आमचा विरोध आहे।
तुम्ही नोकरी करायला अथवा धंदा करायला आलात तरी येथली भाषा शिकण्याचा प्रयत्न केला
नाही, हा त्या भाषेचा अपमान नाही ? नौकरी महाराष्ट्रात परन्तु जाहिरात मराठी वृत्त प्रत्रात नाही ?
काय हा मराठी माणसावर अन्याय नाही ? इंडस्ट्री महाराष्ट्रात आणि कामगार उत्तर भारतीय, काय हा
मराठी माणसावर अन्याय नाही ?
हया आणि अशा अनेक बाबतीत मराठी माणूस स्वतःवर कुठेतरी अन्याय झाला आहे असे
त्याला वाटत होते, परन्तु आज जेव्हा राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा हातात घेतला तेव्हा मराठी माणूस
हे जानत होता की हा राज ठाकरे साठी एकमेव राजकीय मुद्दा आहे , परन्तु मराठी माणूस आज
स्वतःला कुठेतरी या मुद्द्याशी निगडित बघतो कारण अनेक वर्ष त्यांच्या मनात हा मुद्दा घोळत होता
आणि आज तो मुद्दा त्यांच्या तोंडावर आला म्हनुनच आज मराठी माणूस राज ठाकरे च्या सोबत उभा
आहे असे दिसते...